अंत्रोळीत रमजान ईद उत्साहात; सामुदायिक नमाज, बंधुत्वाचा संदेश - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळीत रमजान ईद उत्साहात; सामुदायिक नमाज, बंधुत्वाचा संदेश


समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी (ता. द. सोलापूर) : मुस्लिम समाजाचा वर्षभरातील सर्वात मोठा सण असलेली रमजान ईद अंत्रोळी येथे मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.
   पवित्र रमजान महिन्यातील रोजे (उपवास) पूर्ण झाल्यानंतर ईदच्या निमित्ताने अंत्रोळी येथील ईदगाह मैदान (दरगाह परिसर) येथे सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी सामुदायिक नमाज अदा करण्यात आली.
   या प्रसंगी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे सणाच्या निमित्ताने बंधुत्वाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, या उत्सवात लहान चिमुकल्यांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads