महाराष्ट्र
अंत्रोळीमध्ये भक्तीचा महोत्सव ; राम नवमी ते हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीमय सुरुवात...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (अंत्रोळी) : अंत्रोळी, ता. द. सोलापूर येथे राम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत अंत्रोळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व यथार्थ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होत असून त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. सायंकाळी हरिकीर्तन व रात्री भजनाचा कार्यक्रम राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येत या सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सप्ताहात विविध नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार सहभागी होत असून, ते आपल्या विचारातून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करीत आहेत. सप्ताहादरम्यान दररोज महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी, अंत्रोळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Accelant
उत्तर द्याहटवा