जेऊरवाडीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष; डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.... - दैनिक शिवस्वराज्य

जेऊरवाडीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष; डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी....


समीर शेख प्रतिनिधी 
अक्कलकोट स्टेशन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जेऊरवाडी (भालेराव वस्ती) येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला स्पर्धक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात गायन, नृत्य, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये लहान मुले व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. या माध्यमातून महामानवांना अभिवादन करण्यात आले.
     स्पर्धांचे परीक्षण जेऊरवाडीचे नामवंत कोरिओग्राफर सचिन लक्ष्मण राठोड यांनी केले. त्यांनी स्पर्धकांचे कौतुक करत मार्गदर्शनही केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    यावेळी भालेराव वस्तीतील अबालवृद्धांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचतात," अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads