महाराष्ट्र
शंकरनगर आश्रम शाळेची यशस्वी भरारी ; दहावीला ९२.३० तर बारावीला ९१.१२ टक्के निकाल...
समीर शेख | प्रतिनिधी
मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर : शंकरनगर (विंचूर) येथील श्री सेवालाल माध्यमिक आश्रम शाळेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९२.३० टक्के निखकालाची नोंद केली आहे. शाळेचे एकूण ५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यामध्ये गंगाराम सिद्धलिंग कुंभार याने ९० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. श्रेया जगदेव कांबळे हिने ७५.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर काशिनाथ आप्पासाहेब कुंभार याने ७३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
दरम्यान, नुकताच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालातही शंकरनगर आश्रम शाळेच्या आर्ट्स अँड सायन्स कॉलेजने यशाची परंपरा कायम राखली आहे. कॉलेजचा बारावीचा एकूण निकाल ९१.१२ टक्के इतका विक्रमी लागला.
विज्ञान शाखेत संचिता राठोड हिने ६९.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. समर्थ पवार याने ६१ टक्के गुणांसह द्वितीय, तर संजना शिरोडकर हिने ५१.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
कला शाखेचा निकाल ७३.६८ टक्के लागला असून, संगीता कांबळे हिने ६०.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. खंडू केसकर याने ५५ टक्के गुणांसह द्वितीय, तर लक्ष्मी कोरे हिने ५४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष राठोड, उपाध्यक्ष पद्माजी वडते गुरुजी, सचिव लता राठोड, सहसचिव सुश्रुत राठोड, तसेच प्राचार्य रवींद्र मेघराज राठोड व मुख्याध्यापक बाळासाहेब पारगोंडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा