समर्पित सेवेनंतर शिवाप्पा कोले सेवानिवृत्त ; राउंड टेबल जीवन ज्योत प्रशालेत सत्कार... - दैनिक शिवस्वराज्य

समर्पित सेवेनंतर शिवाप्पा कोले सेवानिवृत्त ; राउंड टेबल जीवन ज्योत प्रशालेत सत्कार...


समीर शेख प्रतिनिधी 
कंदलगाव, दि. 30 मे : राउंड टेबल जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, कंदलगाव येथील ज्येष्ठ शिक्षकेतर कर्मचारी शिवाप्पा बाळाप्पा कोले (मामा) हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने शनिवारी (दि. 30) त्यांचा शाळा, शाळा व्यवस्थापन समिती व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     यावेळी मानाचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन कोले यांना गौरविण्यात आले. अनेक वर्षे शाळेच्या सेवेत कार्यरत राहून त्यांनी संस्थेच्या जडणघडणीत व शालेय उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचा गौरव केला.
   या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक यलगोंडे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना शिवाप्पा कोले यांनी शाळा व संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सेवाकाळातील अनुभवांना उजाळा देत त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. त्यांच्या भाषणाने उपस्थित वातावरण भावुक झाले.
    हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads