पुन्हा जामनेर तालुक्यात संतापजनक घटना शाळकरी मुलीसोबत वृद्धाने केलाअतिप्रसंग .... फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना......
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
फत्तेपूर ता.जामनेर : - देऊळगावगुजरी,गोद्रीतांडा येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतांनाच पुन्हा १८जुलै रोजी राहेरा येथे याच समाजाच्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर वृद्धाने अतिप्रसंग केल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे
राहेरा ता.जामनेर येथील रहिवासी इक्बाल अफजल तडवी हे मजूरीसाठी शेतात गेले होते तर पत्नी बाहेरगावी गेली होती घरी दोघं शाळकरी मुली होत्या त्यातील १३ वर्षीय मुलगी दुपारचे सुमारास जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक शौचालयात शौचास गेली असता त्याठिकाणी मूळ लिहापारध ता.भोकरदन जि. जालना येथील वृद्ध हिरालाल बालचंद डोभाल हा तिच्यासोबत अतिप्रसंग करू लागला त्यामुळे मुलगी घाबरून गेली. तिने वृद्धाच्या हाताला चावा घेऊन तेथून पळ काढला असता लोणी राहेरा रस्त्यावर मुलीची आजी शेतातून घरी येतांना दिसली तेव्हा मुलीने तिला झाल्या प्रकाराची माहिती दिली संबंधित इसम हा राहेरा येथील जीवन रामलाल राजपूत यांचा सासरा असल्याने त्याच्या घरी जावून विचारणा केल्यावर तो पसार झाला होता पिडीत मुलीच्या वडिलांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर हिरालाल बालचंद डोभाल विरुद्ध बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो ) तसेच अनुसुचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम करीत आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा