कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांची बदली; असा अधिकारी पुन्हा मिळणे शक्य नाही ’शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे अधिकारी म्हणून जामनेरकरांच्या मनात निर्माण केली वेगळी ओळख
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांची नुकतीच नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीची माहिती समोर येताच जामनेर शहर व परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अनेकांकडून त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीचे कौतुक केले जात आहे.पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी जामनेरमध्ये आपल्या कार्यकाळात शिस्त, कायदा-सुव्यवस्था आणि कर्तव्यनिष्ठेला विशेष प्राधान्य दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि केलेले प्रयत्न नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील.
शिस्तप्रिय, धडाडीचे आणि कर्तव्याला सर्वोच्च महत्त्व देणारे अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्यकाळात पोलिसिंगमध्ये शिस्तीला महत्त्व मिळाले, तसेच सामान्य नागरिकांमध्येही पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.त्यांच्या बदलीनंतर अनेक नागरिकांकडून, “मुरलीधर कासार यांच्यासारखा अधिकारी जामनेरला पुन्हा मिळणे सोपे नाही,” अशा भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळातील शिस्तबद्ध कारभार आणि कर्तव्यनिष्ठा जामनेरकरांच्या स्मरणात कायम राहणार आहे.
नवीन पोलीस निरीक्षक कोण? उत्सुकता कायम
दरम्यान, जामनेर पोलीस ठाण्याची धुरा आता कोणत्या नवीन पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात येणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नवीन पोलीस निरीक्षक कोण असतील, याकडे जामनेरकरांचे लक्ष लागले असून, अधिकृत आदेशानंतरच याबाबत स्पष्टता होणार आहे.
मुरलीधर कासार यांनी जामनेरमध्ये निर्माण केलेली शिस्त आणि कार्यपद्धती पाहता, नवीन अधिकाऱ्यांसमोरही जामनेरचा कायदा-सुव्यवस्थेचा दर्जा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.शिवस्वराज्य न्यूज परिवारातर्फे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना नाशिक येथील नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेला आणि जामनेरमधील उल्लेखनीय कार्याला मनःपूर्वक सलाम. पुढील सेवाकाळातही आपल्या कर्तृत्वाची अशीच उज्ज्वल छाप उमटत राहो, हीच सदिच्छा
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा