विंचूर येथे सिलेंडर स्फोटात देवकाते कुटुंबाचा संसार खाक ; एम. के. फाउंडेशनकडून तातडीची मदत.. देवकाते कुटुंबाला सावरण्यासाठी दानशूरांनी मदतीचा हात द्यावा ; महादेव कोगनुरे - दैनिक शिवस्वराज्य

विंचूर येथे सिलेंडर स्फोटात देवकाते कुटुंबाचा संसार खाक ; एम. के. फाउंडेशनकडून तातडीची मदत.. देवकाते कुटुंबाला सावरण्यासाठी दानशूरांनी मदतीचा हात द्यावा ; महादेव कोगनुरे


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे शनिवारी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे देवकाते कुटुंबीयांच्या घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
     घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी घटनास्थळी भेट देत जळीतग्रस्त देवकाते कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच फाउंडेशनच्या वतीने तातडीची मदत देऊन कुटुंबाला धीर दिला.
यावेळी कोगनुरे म्हणाले, “देवकाते कुटुंबीयांवर मोठे संकट आले आहे. एका क्षणात त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन शक्य ती मदत करावी.”
     दरम्यान, एम. के. फाउंडेशनच्या तत्पर मदतीचे कौतुक होत असून, जळीतग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads