दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने के. राज डिजिटल प्रेसमध्ये गणरायाची महाआरती.... - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने के. राज डिजिटल प्रेसमध्ये गणरायाची महाआरती....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : के. राज डिजिटल प्रेस, सोलापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. धूप-दीप प्रज्वलित केल्यानंतर श्रींची महाआरती करण्यात आली.
    यावेळी दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सोनकंटले, सचिव सागर सपाने, मल्लिकार्जुन काळे, रायप्पा कुंभार, शंकर सोनार यांच्यासह फोटोग्राफर बंधू उपस्थित होते.
     के. राज डिजिटल प्रेसचे संचालक राजेश कंटकधोंड व शुभम कंटकधोंड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रेसमधील वृत्तपत्र कर्मचारी व सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
    गणेशोत्सवानिमित्त झालेल्या या पूजन व महाआरतीमुळे कार्यालयात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी श्री गणरायाकडे सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads