जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय पथकाची तत्परता; गंभीर हृदयविकाराच्या झटक्यात ७० वर्षीय वृद्धाला जीवनदान! - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय पथकाची तत्परता; गंभीर हृदयविकाराच्या झटक्यात ७० वर्षीय वृद्धाला जीवनदान!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर : स्थानिक उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आज दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास छातीत तीव्र वेदना (Chest Pain) आणि प्रचंड घाम येत असलेल्या गंभीर अवस्थेतील ७० वर्षीय वृद्ध रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णाची नाजूक स्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न करता तातडीने उपचार सुरू केले.

उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे फिजिशियन डॉ. धिरल महाजन यांनी 'STEMI Project' अंतर्गत तात्काळ Serial ECG तपासणी केली. तपासणीत रुग्णाला गंभीर स्वरूपाचा Anterolateral MI with Atrial Fibrillation असल्याचे निदान झाले.

रुग्णाच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन 'Golden Hour'चे महत्त्व ओळखत डॉ. धिरल महाजन यांनी त्वरित वैद्यकीय निर्णय घेत Streptokinase इंजेक्शन देऊन यशस्वी Thrombolysis उपचार केले. तसेच हृदयाचे अनियमित ठोके नियंत्रित करण्यासाठी Injection Amiodarone देण्यात आले.

या आणीबाणीच्या प्रसंगी वेळेचे गांभीर्य ओळखून डॉ. रमेश पाटील सर यांनी तात्काळ आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या तत्पर सहकार्याबद्दल वैद्यकीय पथकाने मनापासून आभार व्यक्त केले.

या संयुक्त आणि तत्पर वैद्यकीय प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती वैद्यकीयदृष्ट्या स्थिर करण्यात यश आले. उपचारानंतर रुग्णाचा रक्तदाब (BP) आणि हृदयाचे ठोके सामान्य स्थितीत आणण्यात यश आले.

जीवनरक्षक Streptokinase उपलब्ध करून देण्यासाठी औषध निर्माण अधिकाऱ्यांचे विशेष योगदान

या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे ठरलेले Streptokinase जीवनरक्षक इंजेक्शन वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे औषध निर्माण अधिकारी श्री. विजयकुमार वाडेकर सर यांनी अथक परिश्रम घेत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

तसेच नाशिक सिव्हिल हॉस्पिटलचे औषध निर्माण अधिकारी श्री. कमलेश भाऊ थोरात यांच्या विशेष सहकार्यामुळे हे इंजेक्शन वेळेत मागवून उपलब्ध करून घेणे शक्य झाले. त्यांच्या दक्षतेमुळे आणि सहकार्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक जीवनरक्षक उपचार तातडीने सुरू करता आले. याबद्दल दोन्ही औषध निर्माण अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक व मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे मार्गदर्शन

ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये 'STEMI'सारख्या जीवनरक्षक योजनांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे सर यांचे निरंतर मार्गदर्शन, सक्षम पाठपुरावा आणि सहकार्य लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना गंभीर हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीची आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.

या संपूर्ण आणीबाणीच्या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय जामनेरमधील सर्व अधिकारी, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहकार्य केले. वैद्यकीय पथकाच्या समन्वयाने आणि तत्परतेने रुग्णावर वेळेत उपचार करण्यात आले.

रुग्णाला वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी सर्व डॉक्टर, अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि आरोग्य पथकाचे मनापासून आभार मानले.

ही माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads