Blog
स्पर्धक क्रमांक ४८ वैष्णवी दत्तू भिसे शिर्डी
राजा शिवछत्रपती
"झंझाविला भगव्याचा समान तुम्ही,जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीचे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी
अखंड महाराष्ट्टाचे कुलदैवत
श्री. राजा शिवछत्रपती
तुम्ही.....
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होता. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरीच्या किल्ल्यावर झाला.त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. शिवरायांचे बालपण खूप धामधूमीत गेले. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षापर्यत आई जिजाऊच्या देखरेखेखाली व शहाजी राजानी नेमलेल्या नामवंत शिक्षकांकडून अनेक कला , विद्या , भाषा अवगत केल्या .
शिवरायांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्टात स्वराज्य नव्हते. महाराष्टाला बहुतांश भाग अहमदशगरचा निजामशहा व विजापूरचा अदिलशाहा यांच्या सत्तेत होता. याविरूध्द लढण्यासाठी व जनतेला कायमचे सुखी करण्यासाठी ते शिवरायांनी स्वराजाचे पवित्र कार्य हाती घेतले. त्यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवराय जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड मोठी होती. त्यांनी जीवास जीव देनारे मावळे निर्माण केले.
शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या तंत्राचा अवलंब करून अनेक गड किल्ले जिंकले. या तंत्राचा वापर करताना त्यांना सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल, डोंगरी, किल्ले , प्रजेचा पूर्ण पाठिंबा मिळाला. शिवाजी महाराजांनी वनदुर्ग , गिरिदुर्ग हे तीन प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये देशप्रमी व आत्मविश्वास निर्माण केला.
शिवरायांना इंग्रजी , सिद्दी व पोर्तुगीज यानां दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले . शिवाजी राजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते .त्यांनी आपल्या स्वराज्याचा कधीही कोणताही भेदभाव केला नाही . संताचा , विदवानांचा सत्कार केला . मंदिर व मशिदीचे रक्षण केले . पर्यावरण सरंक्षणाला प्राधाशान्य दिले . स्त्रियांचा सन्मान केला .
असा हा आदर्श पुत्र , कुशल संघटक , रयतेचा वाली , दुर्जनांचा कर्दनकाळ व सज्जनांचा कैवारी , थोर षुरुष 3 एप्रिल 1680 रोजी जनतेला दुःखसागरात लोटून अनंतात विलीन झाला .
" जिजामाताच्या संस्कारांमुळे , जन्मले शिवराय
शिवरायामुळे घडला इतिहास
ते नसले तरी ...
मात्र त्याचे विचार नेहमीच जिवंत राहतील "....!
आशा थोर , विराला माझा हा मानाचा मुजरा मानाचा मुजरा ...
धन्यवाद!
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा