औरंगाबाद, नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा रोड मेहकर येथे स्वाभिमानीचा रस्ता रोको.
औरंगाबाद, नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा रोड मेहकर येथे स्वाभिमानीचा रस्ता रोको. |
संतोष पाटील (कुळसुंदर )जिल्हा प्रतिनिधी :- कापूस आणि सोयाबीन तसेच विविध शेतकऱ्यांच्या मागण्या साठी रविकांत तुपकर तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत असून त्यांची प्रकृती खालावत चालली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्र्या घेणार आहे.
आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ठिक ११ वाजता खंडाळा बायपास मेहकर औंरगाबाद,नागपूर राष्ट्रीय महामार्गावर माननीय राजू शेट्टी साहेब संस्थापक अध्यक्ष व राज्याचे नेते मा.रविकांत तुपकर यांनी केलेल्या घोषणेनुसार जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली व यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बहुसंख्यंने उपस्थितीत होते.सदर आंदोलनाच्या दरम्यान संपूर्ण रस्ता आडवून सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध केला. सोयाबीन ला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव कपाशीला प्रति क्विंटल 12 हजार रुपये भाव व गेल्या दोन वर्षीचा शंभर टक्के विमा देणे.
शेतकऱ्यांचे विज कनेक्शन न कापने, शेतकऱ्यांना दिवसा लाईट देणे, व शेतकऱ्यांना फसवणा-या पिक विमा कंपनीवर कायदेशीररीत्या कठोर कारवाई करावी, व इतर मागण्यासह आज खंडाळा बायपस मेहकर येथे राष्ट्रीय महामार्गावर सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड,तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,अफरोज खान,सुरेश ढोणे, निलेश सदावर्ते,डिंगाबर सरकटे,पप्पु देशमुख, सतिष वाघ,विजय आंधळे,गोतम सदावर्ते देवेंद्र आखाडे,अमोल घनवट,अस्लमभाई,फयाज भाई राजु शेख,जावेद शहा,अनिल लांडगे,विकास मुळे,डॉ.गजानन बाजड,कैलास उतपुरे,सुरेश खरात,उत्तम खरात प्रभाकर आवारे,मिथुन साळवे,राधेश्याम मानघाले,मेहकर तालुक्यातील सर्व स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर बहुसंख्यने उपस्थित होते.
पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.आंदोलनाच्या दरम्यान सर्वांना ताब्यात घेण्यात आले व नंतर सर्वांची सुटका केली.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा