पहुर कसबे ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा पहुर येथील किरण जाधव यांनी जामनेर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन
जामनेर तालुक्यातील पहुर कसबे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करा. या मागणीसाठी आज जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेत की, पहुर कसबे गावातील छोट्या फिल्टर प्लॅन बाबत पहुर कसबे ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी यांना दिनांक: २९/८/२०२३ रोजी अर्ज दिला आहे. त्या अर्जावर आजपावेतो किरण जाधव यांना कुठलेच उत्तर देण्यात आलेले नाहीत.त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच मागीतलेली माहीती लेखी स्वरूपात त्वरित कळवावी अशी मागणी किरण जाधव यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच निवेदना सोबत ग्रामविकास अधिकारी पहुर कसबे ता.जामनेर यांना देण्यात आलेल्या अर्जाची झेरॉक्स जोडण्यात आली आहेत निवेदनावर किरण जाधव यांची स्वाक्षरी आहे. जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी हे या ग्रामसेवकावर कारवाई करणार का?
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा