नूतन जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांनी स्वीकारला पदभार.....
जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची नुकतीच अहमदनगर येथे बदली झाली होती. येणाऱ्या नूतन अधिकाऱ्याची जामनेर तालुका वासियांना उत्सुकता लागली होती. अखेर आज जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पदभार सोडला असून नाशिक येथून आलेले नूतन पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर माधव कासार यांनी जामनेर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निरोप देण्यात आला तर त्यांच्या जागी बदलून आलेले नूतन पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांचे स्वागत करण्यात आले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा