जामनेरात शिवसृष्टी आणि भीमसृष्टी स्मारकांचे भव्य अनावरण सोहळा....
जामनेर शहरात उद्या एक ऐतिहासिक घटना घडणार आहे, कारण ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसृष्टी आणि भीमसृष्टी' या दोन महान स्मारकांचे अनावरण करण्यात येणार आहे. हा अनावरण सोहळा जामनेर येथील राजमाता जिजाऊ चौकात संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने आणि शिवस्मारक व भीमस्मारक समिती, जामनेर यांच्या संयोजनाखाली होणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि ना. देवेंद्र फडणवीस, तसेच लोकसभा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला शेकडो नागरिकांची उपस्थिती असणार आहे.शिवसृष्टी हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा गौरव करणारे असेल, ज्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या प्रतिष्ठेची आठवण सर्वांना होईल. तर भीमसृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीमधील महत्त्वाचे कार्य आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा देणारे स्मारक आहे.या स्मारकांद्वारे महाराष्ट्रातील भावी पिढ्यांना शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श मिळणार आहे, तसेच त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.सर्व नागरिकांनी या सोहळ्याला हजेरी लावावी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा