भवानी घाटात सागाच्या झाडाला लागली आग – वन विभागाचा तत्काळ हस्तक्षेप आवश्यक
बोदवड-जामनेर रोडवरील भवानी माता मंदिराजवळच्या भवानी घाट परिसरातील सागाच्या झाडाला अचानक आग लागल्याची माहिती मिळाली आहे.परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आग लागल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या प्रशासनाचे कुठलेही पथक घटनास्थळी पोहोचले नसून, तात्काळ वन विभाग व अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा