ती गोष्ट आहे तरी काय? — मंत्री गिरीश महाजनांच्या इशाऱ्यामुळे एकनाथ खडसेंच्या भवतालात खळबळ
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर : मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना एक स्फोटक वक्तव्य केलं मी जर एक गोष्ट सांगितली, तर खडसेंना तोंड काळं करून बाहेर फिरावं लागेल! या इशाऱ्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे — ती गोष्ट आहे तरी काय?महाजन म्हणाले की, मी सुसंस्कृत राजकारणात विश्वास ठेवतो, म्हणून आजवर गप्प आहे. पण जर खोटे आरोप सुरूच राहिले, तर मला ती माहिती जनतेसमोर आणावी लागेल.असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या समर्थकांनी हे वक्तव्य असत्य आणि जनतेचे लक्ष विचलित करणारे असल्याचे म्हटले जात आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा