सेलु पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा ; सेलू पोलीस निरीक्षक
सेलु प्रतिनिधी / अमोल शिंदे :-
सेलु पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत निवडणुकितील पॅनल प्रमुख, उमेदवार यांना सूचना आहे. आज मतमोजणी असून विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही. सध्या जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)चा अमल चालू आहे. त्यामुळे DJ किंवा साउंड बॉक्स लावून / बँड लावून मिरवणूक काढणे, उगाच पराभूत उमेदवार यांचे गल्लीत/ घरासमोर जाऊन फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे वर्तन/प्रकार कटाक्षाने टाळावेत. जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी त्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल.
पराभूत उमेदवार यांनी देखील पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
पोलीस निरीक्षक, तालुका सेलु पोलीस स्टेशन
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा