होमगार्डसना सलग सहा महिने काम 350 कोटींची तरतूद शासनाच्या निर्णयाचे जामनेरात स्वागत....
होमगार्ड अर्थात राज्य गृहरक्षक दलासंबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. होमगार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच दर तीन वर्षांनी केली जाणारी त्यांची नोंदणी आता बंद करण्यात येईल अशीही घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
होमगार्डसाठी दर तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद करण्यात येत आहे. होमगार्डना कवायत भत्ता देखील मंजूर केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.
त्यानिमित्त जामनेर येथील तालुका अधिकारी समादेशक भगवान पाटील यांनी शहरातील भुसावळ चौकात शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. आनंदोत्सव साजरा केला.यावेळी पोलीस कर्मचारी होमगार्ड उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा