खाकीतली माणुसकी...जामनेर वाहतूक पोलीस धावले मदतीला - दैनिक शिवस्वराज्य

खाकीतली माणुसकी...जामनेर वाहतूक पोलीस धावले मदतीला


जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे

जामनेरमध्ये खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडले.जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील रहिवासी शिक्षक लीलाधर पाटील हे जामनेर येथे आज संध्याकाळी चार पाच वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी जामनेर नगरपरिषद समोर आले. भाजीपाला घेत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळले.  चक्कर येऊन जखमी झालेल्या अवस्थेत शिक्षक लीलाधर पाटील यांच्या मदतीला तातडीनं धावून जात  वाहतूक पोलिस  शिवाजी पाटील जगदीश सोनार तसेच सामाजिक कार्यकर्ता शिवम माळी यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. 
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस शिवाजी पाटील यांनी स्वत: तत्काळ धाव घेत त्या शिक्षकाला उचलून  खाजगी रिक्षातून जामनेर उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
 वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील वाहतूक नियोजनाचे काम करत होते. त्यावेळी रस्त्यावर जखमी अवस्थेत शिक्षक लीलाधर पाटील जमिनीवर पडलेले दिसले. शिक्षकाला उठता येत नसल्याचे लक्षात येताच पाटील सामाजिक कार्यकर्ते शिवम माळी यांनी  रस्त्यातील वाहने थांबवून  शिक्षकाला आधार देत त्यांनी  उचलून जवळच असलेल्या जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले.वाहतूक पोलीस शिवाजी पाटील यांनी संबंधित डॉक्टरांशी बोलून तात्काळ उपचार करण्यासाठी सांगितले. तसेच शिक्षकांच्या नातेवाईकांना फोन करून या घटनेची त्यांनी माहिती दिली व त्यांना बोलावून घेतले.पुढील उपचारासाठी शिक्षक यांना जळगाव येथे रवाना करण्यात आले.नागरिकाकडून वाहतूक पोलीस व सामाजिक कार्यकर्ता यांच्यावर   कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads