फत्तेपूर पोलीस ठाण्यात सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी स्वीकारला पदभार.... कायदा सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध
फत्तेपूर : गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी 28 मार्च रोजी फत्तेपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींसाठी थेट इशारा दिला –गुन्हेगारीला फत्तेपूरमध्ये थारा नाही, अवैध धंदे करणाऱ्यांनी सावध व्हावे
बोडवड आणि रावेर येथे प्रभावी कारवाई करून नावलौकिक मिळवलेल्या अंकुश जाधव यांनी सहा वर्षे नाशिक शहरात सेवा बजावली आहे. तिथे त्यांनी अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले. आता फत्तेपूरमध्ये त्यांचे आगमन होताच स्थानिक गुन्हेगारी जगतामध्ये खळबळ उडाली आहे.पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत एक स्पष्ट संदेश दिला
कोणीही बेकायदेशीर कृत्य करू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणी आल्या तर त्यांना तत्काळ मदत केली जाईल.सहा. पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या बदलीनंतर आलेले अंकुश जाधव यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यांच्या जलद निर्णयक्षमता आणि कडक शिस्तीमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.
फत्तेपूर पोलीस ठाण्यातील हा नवा सिंहासन बदल गुन्हेगारी प्रवृत्तींना नेस्तनाबूत करेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा