अरविंद देशमुख यांची 'दै. जळगाव तरुण भारत' संचालकपदी सर्वानुमते निवड..
जळगाव, दि. 2 एप्रिल 2025 – अनुभवी पत्रकार अरविंद देशमुख यांची सर्जना मीडिया सोल्यूशन संचालित दै. जळगाव तरुण भारतच्या संचालकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, सचिव संजय नारखेडे, निवासी संपादक चंद्रशेखर जोशी, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.अरविंद देशमुख यांनी 2000 ते 2014 या कालावधीत दै. तरुण भारतचे पहूर वार्ताहर म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांनी आपल्या परखड आणि अभ्यासपूर्ण लेखनशैलीमुळे स्थानिक पातळीवरील महत्त्वपूर्ण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांना वाचा फोडली. गावखेड्यातील समस्यांना प्रकाशझोतात आणून सामान्य जनतेच्या हितासाठी पत्रकारितेचा प्रभावी उपयोग करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.पत्रकारितेबरोबरच अरविंद देशमुख हे सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. नुकतीच त्यांची जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्हा. चेअरमनपदी निवड झाली आहे. तसेच, ते जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.'दै. जळगाव तरुण भारत'च्या संचालकपदी निवड झाल्यानंतर पत्रकार, सहकार क्षेत्रातील नेते, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तसेच वाचक वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.संघर्षातून मिळवलेले यश अधिक कडसर असते. पत्रकारिता ही माझी ओळख असून, या नव्या जबाबदारीतून 'दै. जळगाव तरुण भारत'च्या प्रगतीसाठी पूर्ण ताकदीने काम करेन," अशी भावना अरविंद देशमुख यांनी व्यक्त केली.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा