जामनेरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य शोभा यात्रा; मंत्री गिरीश महाजन यांचेही नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी गणेशवाडी, जामनेर येथे एक भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ४:३० वाजता शनीमंदिर परिसरातून सुरू होणाऱ्या या मंगल यात्रेत हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.या शोभायात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रभू श्रीराम हे आपल्या संस्कृतीचे प्राण आहेत. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन भक्ती व एकतेचा संदेश द्यावा, असे ते म्हणाले.या शोभायात्रेचे आयोजन प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती (गणेशवाडी), जामनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून, भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात प्रभू श्रीरामाच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खास प्रसंगी सहभागी होण्यासाठी आणि आपल्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी समितीने एक खास लिंक देखील उपलब्ध करून दिली आहे, जिथे भाविक आपला फोटो पोस्ट करू शकतात:
Instagram Story लिंक
शोभायात्रेची ठिकाणे व वेळ:
तारीख: ६ एप्रिल २०२५
वेळ: संध्याकाळी ४:३०
स्थळ: शनीमंदिर, गणेशवाडी, जामनेर
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा